पनवेल तालुक्यातील मौजे आकुर्ली येथील पॅराडाईज आकुर्ली गृहनिर्माण संस्था वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून
अलिबाग,जि.रायगड,
दि.11 (जिमाका) : जिल्ह्यातील
पनवेल तालुक्यातील मौजे आकुर्ली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने
या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या पॅराडाईज,आकुर्ली गृहनिर्माण
संस्था, डी विंग आकुर्ली ता.पनवेल ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव
टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून
घोषित करण्यात आली होती.
मात्र आता करोना
बाधित रुग्णाला रुग्णालयातून दि.13 मे
2020 रोजी डिस्चार्ज मिळाल्याने. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य
व्यक्तीही अद्यापपर्यंत करोना विषाणूमुळे
संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही.
त्यामुळे हा
परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून
वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
0000
Comments
Post a Comment