स्थलांतरीत मजूरांना मूळ गावी जाण्याची संधी दि.12 ऑगस्टपर्यंत माहिती भरण्याचे कामगार विभागाचे आवाहन
वृत्त क्रमांक
:- 996 दिनांक :- 20
जुलै 2020
अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):- जिल्हयात
राहणाऱ्या परराज्यातील मजूरांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर
स्वत:ची माहिती भरावी, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.
करोना
प्रादूर्भावाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमित रेल्वे सेवा दि.12
ऑगस्ट, 2020 पर्यंत स्थगित असल्याने स्थलांतरीत मजूरांना आपली माहिती दि.12 ऑगस्ट,
2020 पर्यंत भरता येईल. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालयात स्थापित
सहाय्यता केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित सहाय्यता केंद्र, त्याचप्रमाणे
कामगार विभागाच्या वर्तमान योजनांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी जिल्हयात
राहणाऱ्या परराज्यातील मजूरांनी त्यांना आपल्या
गावी जायचे असल्यास त्यांची माहिती संबंधित संकेतस्थळावर भरावी, असे आवाहन कामगार उपायुक्त
पी.एन.पवार यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment