कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत “21 वा कबड्डी दिन” मुंबईच्या कार्यालयात साजरा “कबड्डी महर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांना वाहिली आदरांजली
अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) ::- “कबड्डी महर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांचा
जन्मदिन (दि.15 जुलै) मुंबईच्या राज्य कबड्डी असो.च्या कार्यालयात अत्यंत
साधेपणाने व मोजक्या कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात
आला.
यावेळी जेष्ठ खेळाडू भारतीय
संघाचे संघनायक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ, अर्जुन पुरस्कारप्राप्त
श्रीराम (राजू) भावसार, मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू पंकज मोहिते यांच्या हस्ते प्रथम
बुवांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मिनानाथ धानजी (संघटक-शिवछत्रपती
पुरस्कार), रवींद्र करमरकर (शिवछत्रपती पुरस्कार), राजेश पाडावे (शिवछत्रपती), रमेश
हरयाणा, मालोजी भोसले (सचिव-ठाणे जिल्हा), शशिकांत राऊत, सदानंद माजलकर, अनिल
नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. “कबड्डी महर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मृति निमित्ताने धानजी,
राजू भावसार, रवी करमरकर, रमेश हरयाणा यांनी बुवांच्या आठवणींना उजाळा दिला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल
डिस्टन्सिंगचे पालन करीत व मास्क घालून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र
राज्य कबड्डी असोसिएशन, शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच
प्रवीण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धानजीनी यांनी
केले व आभार शशी राऊत यांनी मानले.
000000
Comments
Post a Comment