भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
अलिबाग,जि.रायगड,
दि.20 (जिमाका) : केंद्र शासनाच्या
भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय
(सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता
महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) येथील 13 व बेंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशाकरिता
पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर,
मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 17 जुलै 2020 पर्यंत
मागविण्यात आले होते.
मात्र आय.आय.एच.टी बरगढ यांच्याकडून
अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता हे अर्ज दि.6 ऑगस्ट 2020 पर्यंत मागविण्यात
येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक
माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाइटवर उपलब्ध
आहे तसेच या अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातदेखील
उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त माधवी खोडे-चवरे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment