ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता विषयावरील राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन
अलिबाग,जि.रायगड
दि.14 (जिमाका) :- पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्य पाणी व स्वच्छता मिशन राबविण्यासाठी
ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार
करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हयातील
कलाकार, विद्यार्थी, विविध प्रकारच्या संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी
व्हावे,असे आवाहन जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
या स्पर्धेची सर्वसाधारण नियमावली पुढीलप्रमाणे-
लोगो ग्रामीण
पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल, असा असावा., ब्रीदवाक्य
मराठीतूनच असणे बंधनकारक असेल., ब्रीदवाक्य मोजक्या शब्द मर्यादेत असावे.,या
स्पर्धेत व्यक्ती,संस्था,जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.,बोधचिन्ह (लोगो) एकरंगी,बहुरंगी
प्रकारात असला तरी चालेल.,सहभागी लोगोची Soft copy पाठविणे आवश्यक असेल. त्यासोबत
स्पर्धकाची संपूर्ण माहिती उदा.संपर्क क्रमांक इ. असणे आवश्यक असेल., ज्या स्पर्धकाचा
लोगो अंतिम निवड होईल त्यांनी cdr (Coral Draw) फाईल्स उपलब्ध करुन देणे आवश्य्क
असेल., लोगो अंतिम करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील.,
स्पर्धेतील सहभागींनी लोगोची Soft Copy विभागाच्या directorwsso@gmail.com आणि iccwsso@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी. ज्या बोधचिन्ह् आणि बोधवाक्यांची अंतिम निवड
होईल त्यांना रुपये 50 हजार एवढी रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येईल. बुधवार, दि.
30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत प्रवेशिका पाठविता येतील.
00000
Comments
Post a Comment