एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक व मतदारयादीचा कार्यक्रम रद्द जिल्ह्यात रोहा तालुक्यातील फक्त एका ग्रामपंचायतीचा समावेश


           अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्‍याने जाहीर करण्याचा  कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

        राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दि.31 मार्च 2020 रोजी जिल्‍ह्यात एप्रिल  ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम दि.17 मार्च  2020  रोजी करोना महामारीमुळे आहे त्‍या टप्‍यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्‍यात येवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्‍यात आलेली मतदारयादी व चालू निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

      यानुसार एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी त.अष्टमी या ग्रामपंचायतीसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.

00000

  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक