शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अलिबाग,जि.रायगड,दि.1
(जिमाका) :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग येथे सुरू
असणाऱ्या तयारीची पाहणी केली व त्यांनी पुढील आवश्यक त्या कार्यवाही लवकरात लवकर
करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी
जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पालकमंत्री महोदयांचे खाजगी
सचिव डॉ.जगन्नाथ वीरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
राहुल मोरे, अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ व इतर अधिकारी
कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment