रस्ता सुरक्षा अभियान-2021 अंतर्गत श्रीवर्धन येथे दि.03 फेब्रुवारीला विशेष शिबिराचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- रस्ता सुरक्षा अभियान-2021 अंतर्गत उप  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण मार्फत दि.03 फेब्रुवारी 2021 रोजी श्रीवर्धन येथे विशेष शिबीर (कॅम्प) आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रस्ता सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीकरिता ऑनलाईन अपॉईटमेंट घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत