अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींनी अंतिम प्रमाणपत्र पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून घेऊन जावे

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका):- अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017) आणि 107 वी (एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवार योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल येथे झालेल्या परीक्षेचे अंतिम प्रमाणपत्र मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल येथे डीजीईटी, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले आहेत.

तरी संबंधित प्रशिक्षणार्थींनी आपले अंतिम प्रमाणपत्र कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत स्वतः उपस्थित राहून प्राप्त करून घ्यावेत, सोबत मूळ गुणपत्रक आणावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान