नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे.

रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

ही  प्रक्रिया सहजपणे करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल:  http://voterportal.eci.gov.in/  किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार हेल्पलाईन मोबाइल अॅप Android - https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen 

iOS-  https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे.

या सुविधेत आपले e-EPIC मोबाईल / डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यायोग्य असून डिजिटली मोबाईलवर संग्रहित करता येते. हे स्वतः मुद्रण (print) करण्यायोग्य आहे तसेच प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्रासह सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे.

e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया Register Login on NVSP/ Voter Portal, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक नमूद करणे, नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेला OTP तपासून घेणे, e-Epic डाउनलोड करणे अशा प्रकारे आहे.

 या सुविधेची कार्यपद्धती एक व्यक्ती एक मोबाईल नंबर असलेले मतदार हे मतदार हेल्पलाईन App किंवा मतदार पोर्टलवर किंवा स्वतःच्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करून e-EPIC डाउनलोड करून घेऊ शकतात, अशी आहे.

माहे डिसेंबर 2020 व  दि. 15 जानेवारी 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या नवमतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती निधी चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक