साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

 


अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी., 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ.करिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला,गुणपत्रिका, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था (मर्या) सदनिका क्र.02 तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, रायगड अलिबाग, मो.नं.8976959795/8767682731 या पत्त्यावर दि. 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), रायगड-अलिबाग श्री.अंगद लिंबाजी कांबळे यांनी केले  आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक