अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेतील शिकाऊ उमेदवारांनी अंतिम परीक्षेचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता संस्थेशी संपर्क साधावा
अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):-
अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर
2017) आणि 107 वी एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक
सूचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षेचे अंतिम प्रमाणपत्र मूलभूत प्रशिक्षण तथा
अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल या आस्थापनेमध्ये डी.जी.ई.टी नवी दिल्ली यांच्याकडून
प्राप्त झाले आहेत.
हे
प्रमाणपत्र वितरणासाठी उपलब्ध असून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र कार्यालयीन
दिवशी कार्यालयीन वेळेत मूळ गुणपत्रकासह स्वतः उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावे,
असे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल
श्री.वि.द.टिकोले यांनी कळविले आहे.
00000000
Comments
Post a Comment