केंद्रीय विद्यालय ओ.एन.जी.सी. पनवेल “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम 2022; कार्यक्रमात सहभागी होण्याचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यालय प्रबंधन समितीस प्राचार्य श्री.सोहन लाल यांचे आवाहन

 


अलिबाग, दि.30 (जिमाका):- परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्यामध्ये दि.01 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना संबोधित करणार आहेत. हा एक बहुचर्चित व अत्यंत लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमाद्वारे परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर येणारा ताणतणाव कसा कमी करता येईल, याबद्दल आपल्या विशेष शैलीमध्ये निराकरण करणार आहेत.

हा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी आणि या उपक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी केंद्रीय विद्यालय ओ.एन.जी.सी. पनवेलचे प्राचार्य  श्री.सोहन लाल हे अथक परिश्रम घेत आहेत. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यालय प्रबंधन समिती या सर्वांना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत