महाराष्ट्र दिनी सामाजिक न्याय विभाग उभारणार योजनांचा स्टॉल
अलिबाग,दि.30 (जिमाका):- दि.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते पोलीस ग्राऊंड अलिबाग येथे सकाळी 8.00 वा.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा स्टॉल उभारण्यात येणार असून सामाजिक
न्याय विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या योजनांची माहिती असणारे संक्षिप्त बॅनर
लावण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्तालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणाऱ्या
माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच माहिती पत्रके सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका
येथे वाटपासाठी पाठविण्यात आली आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामसेवक, विस्तार
अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून ध्वजारोहण कार्यक्रमानंतर योजनांचे संक्षिप्त
वाचन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील मुख्य कार्यक्रम तसेच सर्व
ग्रामपंचायती, पंचायत समिती व नगरपालिका येथे होणाऱ्या कार्यक्रमांकरिता जास्तीत
जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी
सुनिल जाधव यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment