जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त दि.23 जून रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे अलिबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमात जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ खेळाडूंचा होणार सत्कार
अलिबाग,दि.22 (जिमाका):- जगभरात दि.23 जून हा दिवस “जागतिक ऑलिम्पिक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे दि.23 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जंजिरा हॉल, अलिबाग पोलीस मुख्यालय येथे जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
00000

Comments
Post a Comment