आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणारे स्वयंसेवक व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तिसरे पथक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाकरिता ओरिसाला रवाना

  


अलिबाग,दि.20(जिमाका):- जिल्ह्यामधील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे 60 जणांचे तिसरे पथक मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, भुवनेश्वर, ओरिसा येथे प्रशिक्षणाकरिता आज रवाना झाले.

जिल्ह्यातील नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती पाहता या प्रशिक्षणाचे महत्त्व जाणून भुवनेश्वर येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील स्वयंसेवक व शासकीय अधिकारी कर्मचारी पाठवावेत, असा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला.

यापूर्वी स्वयंसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 50-50 च्या एकूण दोन बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता ही तिसरी बॅच पाठविण्यात आली आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन