एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत
अलिबाग, दि.23 (जिमाका):- शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या
परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करूण उत्तीर्ण झालेले माजी सैनिक विधवांच्या
पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात
येणार आहे.
हा पुरस्कार
प्राप्त करण्यासाठी माजी सैनिक विधवांनी माजी सैनिक विधवेचा हस्तलिखित अर्ज, डी.डी.
40 फॉर्म, माजी सैनिक विधवा ओळखपत्र, एस.एस.सी/ एच.एस सी बोर्डाच्या प्रमाणपत्राची
छायांकित प्रत, एस.एस.सी./एच.एस.सी. बोर्डाच्या गुण पत्रकाची छायांकित प्रत ही
कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दि.15 सप्टेंबर 2022 पूर्वी
सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment