माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकरिता शिष्यवृतीसाठी अर्ज सादर करावेत


अलिबाग, दि.23 (जिमाका):- सन 2021-2022 मघ्ये इयत्ता 10 वी व 12 वी व पदवी/पदविका परिक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणाऱ्या तसेच विद्यापीठाने मान्य केलेल्या विषयांमध्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणाऱ्या (पीएचडी व तत्सम) माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृती देण्यात येणार आहे. या कामी माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी वैयक्तिक अर्ज, डी डी-40 अर्ज (कार्यालयात उपलब्ध आहे.), ओळखपत्राची पाठपोठ छायांकित प्रत, सध्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रिकेची प्रमाणित सत्यप्रत, डिस्चार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रमाणित छायांकित प्रत, इतर कोणतीही शिष्यवृती मिळत नसल्याबाबतचा कॉलेजचा दाखला या कागदपत्रांसह आपले अर्ज दि.10 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत.

या संधीचा जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक/माजी विधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग डॉ. पद्मश्री एस. बैनाडे, यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन