जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना मोफत एआरटी औषधे हस्तांतरित आर.सी.एफ, थळ यांनी केले मोलाचे सहकार्य
अलिबाग,दि.01(जिमाका): 01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त
प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा मुंबई
यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा कार्यक्रम
व्यवस्थापक संजय माने यांच्या नियोजनानुसार प्रभात फेरीचे आयोजन करून साजरा करण्यात
आला. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या
शुभहस्ते व आर.सी.एफ.कंपनी थळ यांच्यामार्फत सामाजिक
बांधीलकी जपत एचआयव्ही
संसर्गित व्यक्तींना मोफत एआरटी औषधे हस्तांतरित करण्यात आली.
0000000
Comments
Post a Comment