पशुसंवर्धन विभागाच्या वतीने “महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा

 


अलिबाग,दि.17(जिमाका):- शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि.24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पो मध्ये देशातील विविध प्रकार व जातीची तसेच अतिशय दुर्मिळ प्रकारची जनावरे पाहण्याची संधी पशुप्रेमींना व पशुपालकांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान, चारा पिके व पद्धती फायदेशीर शेळीपालन, कुक्कुट पालन (मांसल/परसातील/अंडी घालणारी) व पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य व रोजगार निर्मितीच्या संधी आणि लिंग विनिश्चित रेतमात्रा (ET/IVF), भविष्यातील आव्हाने, अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या महापशुधन एक्स्पो- 2023 ला भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.रत्नाकर काळे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान