श्री सिद्धिविनायक सामाजिक मंडळाच्या वतीने जागर सामाजिक न्यायचा
ऐका..हो ऐका...!
अलिबाग,दि 21(जिमाका:- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची जनजागृती खोपोली बस स्थानक, हाळ खुर्द, महड श्रीक्षेत्र वरद विनायक, खालापूर बाजारपेठ या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.
या कलापथकाचे नेतृत्व शितल म्हात्रे करीत असून कलाकार म्हणून तुषान मढवी, अलंकार पाटील, श्रावणी राऊत, नेहा पाटील, सानवी म्हात्रे, मृदुला म्हात्रे, कृतिका वाटकर आदी कलाकार सहभागी झाले होते. खालापूर महड येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सीताराम बडगुजर तसेच हाळखुर्द येथील कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका शबिया शहानवाज धनसे यांनी परिश्रम घेतले.
0000000
Comments
Post a Comment