पेण व खालापूर तालुक्यात श्री सिद्धिविनायक सामाजिक मंडळाच्या माध्यमातून “निर्णय वेगवान,महाराष्ट्र गतिमान” पथनाट्यातून जनजागृती

 

   अलिबाग,दि.20(जिमाका):- शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व श्रीसिद्धिविनायक मंडळाच्या वतीने खालापूर व पेण तालुक्यातील खालापूर बस स्थानक, शिरवली, पेण तालुक्यातील कामार्ली या ठिकाणी शासनाच्या कल्याणकारी योजनांची "निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान" या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विकासाच्या योजना, सुधारित बीज भांडवल योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांसह, ध्वजदिन निधी संकलन, सैनिकांप्रति आदर, व्यसनमुक्ती त्याच बरोबर महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत अशा विविध विषयांवर जनप्रबोधन केले.

या कलापथकाचे नेतृत्व शीतल म्हात्रे करीत असून कलाकार म्हणून तुषान मढवी, अलंकार पाटील, श्रावणी राऊत, नेहा पाटील, सानवी म्हात्रे, मृदुला म्हात्रे, कृतिका वाटकर आदी कलाकार सहभागी झाले आहेत. शिरवली येथे हे पथनाट्य कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी उपसरपंच सदानंद महादेव महाडिक यांनी सहकार्य केले तसेच यावेळी अंगणवाडी सेविका कलावती दामोदर गोरडे या देखील उपस्थित होत्या. तसेच कामार्ली येथील कार्यक्रमास सारिका सुदाम पाटील-सेविका आदिवासीवाडी, अक्षय ग्रामसंघाच्या शुभांगी खरिमले, सचिव मोहिनी पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरु झालेल्या या लोकजागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

0000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन