आय आय एच टी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग,दि.24(जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता 1 जागा तसेच वॅकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्या मार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 20 जून 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि. 20 जून 2023 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच या अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर एम.जे. प्रदिप चंदन, भा.प्र.से. यांनी कळविले आहे.
००००००००
Comments
Post a Comment