नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

            अलिबाग,दि.23 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.27  मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत  श्री समर्थ मंगल कार्यालय, समर्थ ढाबा शेजारी, जाधव फार्म,मुंबई-पुणे हायवे, खोपोली, ता.खालापूर  या ठिकाणी नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय  महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. या महारोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी पास, आय.टी.आय.डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहीती उमेदवारांना दिली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in, या संकेतस्थळावरील Employment Job Seeker (Find A Job) Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ॲप मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing Agree व दिसणाऱ्या विविध पदांसाठी आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावेत.

महारोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांच्या 9421613757 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक