छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा इच्छुक विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा


 

 अलिबाग,दि.16(जिमाका):- पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत पेण विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी व पालकांकरिता गुरुवार, दि.18 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता आगरी समाज सभागृह, चिंचपाडा पेण येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरात दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना करीअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, कौशल्याधारित व्यवसाय अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, शिक्षणिक कर्ज  इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 तरी पेण मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवार, विद्यार्थी  व पालक यांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी केले आहे.

०००००००

Comments