निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

 


रायगड (जिमाका) दि.05 :-  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी  सामान्य निवडणूक निरीक्षक रुही खान, सतिश कुमार एस आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मनुष्यबळाची दुसरी जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकूण 2हजार 820 मतदान केंद्रा करीता 14 हजार 216 इतकी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.  जिल्ह्यात उपलब्ध कर्मचारी संख्या 15 हजार 169इतकी आहे. या सर्व कर्मचाऱयांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली.

188 पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण 604 मतदान केंद्र असून 3 हजार 74 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 3 हजार 487 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

189 कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 362 मतदान केंद्र असून 1 हजार 934 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 961 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

190 उरण विधानसभा मतदार संघात एकूण 355 मतदान केंद्र असून 1 हजार 869 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 893 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

191 पेण विधानसभा मतदार संघात एकूण 380 मतदान केंद्र असून 2 हजार 24 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 2 हजार 360 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 375 मतदान केंद्र असून 1 हजार 983 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 992 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण 351 मतदान केंद्र असून 1 हजार 658 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 734 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण 393 मतदान केंद्र असून 1 हजार 674 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 740 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक