जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

 

 

रायगड,दि.18(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी  दिली आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकारणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांच्या थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

दि.22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग ए. एस. राजदेकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान