पनवेल-खारघर मध्ये 5 ठिकाणी रोजगार महाकुंभ भव्य रोजगार मेळावे
रायगड-अलिबाग,दि.28(जिमाका) : दि.29 सप्टेंबर पनवेल-खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, प्लॉट नं. 2 व 3, सेक्टर 16, ठाणा नाका जवळ, खांदागाव, न्यू पनवेल, ITM स्किल्स युनिव्हर्सिटी, प्लॉट 25 व 26, सेक्टर 4, खारघर,) MGM एज्युकेशनल कॅम्पस, 3 रा मजला, प्लॉट 1 व 2, सेक्टर-01, कामोठे, हसमुख भवन, 3 रा मजला, सिडकोच्या मागे, हिरानंदानी पार्क जवळ, सेक्टर 4, खारघर या पाच ठिकाणी रोजगार महाकुंभ रोजगार मेळावे संपन्न होणार असून याचा इच्छूकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल वि.द.टिकोले यांनी केले आहे.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.29 सप्टेंबर2026 रोजी राज्यभरात 800 ठिकाणी "रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र" रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या दिवशी सकाळी 8.00 वाजता सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपले आधारकार्ड, बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून इच्छुक उमेदवारांना तात्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
00000000
Comments
Post a Comment