Posts

क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे

Image
क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा                                            -- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे अलिबाग(जिमाका)दि.24:-   औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन क्षयरोग निर्मुलनाचे काम करणे आवश्य्क आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज येथे केले. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरुळ ता.अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.अजित गवळी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,परिवहन मंडळाचे व्यवस्थापक श्री.गिते,श्रीमती अनिता गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. ड...

राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर

Image
राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त                                                          - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर             अलिबाग दि.23 (जिमाका), राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे भविष्यकाळासाठी उपयुक्त असून विविध शिबिरातून मिळणारी ज्ञानाची व संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज येथे केले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीनविरा येथील विश्रामगृह येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय निवासी शिबिराच्या सांगता समारोप प्र...

सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या

24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या        जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यांत येत आहे. यानिमित्त क्षयरोगाची माहिती व्हावी,क्षयरोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी.  क्षयरोग नियंत्रणात राहण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही,तसेच क्षयरोगाची लागण होऊ नये आणि पुढील पिढी क्षयमुक्त व्हावी, यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबतची माहिती देणारा लेख…             क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टूबरक्युलोसीस या जंतूमुळे होतो. या जंतूचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 रोजी लावला.या शोधाच्या एका शतकानंतर म्हणजेच 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट् टूबरक्युलोसीस  अँड लंग डिसीज (IUATLD) यांनी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग  रोग दिन म्हणून साजरा केला जाईल,असे जाहिर केले. तेंव्हापासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जात आहे. क्षयरोगाची लक्षणे दोन आठवडे किंवा जास्त काळ खो...

राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना व प्रेरणा देणारा - प्रा.नारायण बाबर

राज्याचा अर्थसंकल्प  विकासाला चालना व प्रेरणा देणारा                                                                                 - प्रा.नारायण बाबर अलिबाग दि.20 (जिमाका), राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना आणि प्रेरणा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयाचे व्यवसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.नारायण बाबर यांनी आज येथे व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, माहिती अधिकारी विष्...

शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक                                                --  केंद्रीय मंत्री अनंत गीते  अलिबाग, दि. 16 (जिमाका) :-      जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिले.   केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस पंचायत समितीत्यांचे नवनिर्वाचित सभापती,उपसभा...

प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त                                     --  केंद्रीय मंत्री अनंत गीते              अलिबाग दि. 16 (जिमाका):-  युवकांना रोजगार व स्वयंरोजगार करता यावा. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी  प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त असून ही योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिल्या. केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत इतर विषयांबरोबरच मुद्रा योजनेचा आढावा घेऊन  मार्गदर्शन करतांना मंत्री...

अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 15/03/2017                                                                                                   वृत्त क्र. 147 अभिलेख जतन करणे  ही महत्वपूर्ण जबाबदारी                                                        ...