Posts

आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले        अलिबाग, (जिमाका)दि.8:- येत्या मान्सुनमध्ये  जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर  मदत व बचाव कार्य तत्परतेने  होण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व संबंधित  प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सून-2017पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, रविंद्र बोंबले,बाळासाहेब तिरके, प्रविण पवार,अमरसिंग भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक,तसेच तहसिलदार, नगरपरिषद ...

महाराष्ट्र दिन समारंभ रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबध्द -पालकमंत्री प्रकाश महेता

Image
  महाराष्ट्र दिन  समारंभ   रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण     विकासासाठी सदैव कटिबध्द                                                 -पालकमंत्री प्रकाश महेता           अलिबाग दि.1 (जिमाका)   रायगड जिल्हयाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असून सर्वांच्या साथीने रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश महेता यांनी महाराष्ट्र दिन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतांना केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवार, दि.01 मे 2017 रोजी  त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वज वंदन समारंभ  अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते. या समारंभासाठी ...

जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य                                   - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस             अलिबाग दि.28 (जिमाका), जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या गुंतवणूकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाताळगंगा येथे केले.             रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोकुयो व भारताच्या कॅम्लीन यांच्या संयुक्त नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जपानचे राजदूत केंग हिरामटसु, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले,   कॅम्लीनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुख्य कार्यकारी अधि...

सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने व्हावी यासाठी योग्य ते नियोजन करावे -- निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे

Image
सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने व्हावी  यासाठी योग्य ते नियोजन करावे                                                -- निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे         अलिबाग दि. 15:- (जिमाका) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता एमएच-सीईटी-2017 दि.11 मे 2017 रोजी होणार असून ही परीक्षा जिल्हयात नियोजनबध्द पध्दतीने व्हावी यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे दिल्या.                यावर्षाची एमएच-सीईटी-2017 परीक्षा सुव्यवस्थित पार पडावी यासाठी नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व डिजी धन मेळावा जिल्हयात उत्साहात साजरा

Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व डिजी धन मेळावा जिल्हयात उत्साहात साजरा          अलिबाग दि.14 (जिमाका), महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त त्यांना रायगड जिल्हयात सर्वत्र अभिवादन करण्यात आले. तसेच या जयंतीच्या औचित्याने निती आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हात सर्वत्र डिजी धन मेळावा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हयातील 15 तालुक्यात व अन्य महत्वाच्या गावांमध्ये ही वेगवेगळया उपक्रमांनी हा ज्ञानदिन दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध उपक्रम             पेण महसूल विभाग :- पेण महसूल विभागात आमदार र्धेयर्शिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित, पेण उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुलदवाड, पेण तहसिलदार अजय पाटणे, पाली उपविभागीय अधिकारी नितील सदगीर, सुधागड पाली तहसिलदार व्ही.एन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध का...

डीजीधन मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे - प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

Image
डीजीधन मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे                                                    - प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर             अलिबाग दि.12 (जिमाका), निती आयोगाने ठरवून दिलेल्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 14 एप्रिल, 2017 रोजी प्रत्येक तालुका ठिकाणी Digital Financial Drive  चे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी केले आहे.             मोहिम उद्दिष्ट मा.पंतप्रधान, भारत सरकार यांच्या उपस्थितीत 14 एप्रिल, 2017 रोजी नागपूर येथील 100 वा डीजी धन  मेळाव्याचे उद्घाटन करण...

भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन 28 स्थळांचा विकास करणार -- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

Image
भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने   पावन 28 स्थळांचा विकास करणार                                                -- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले         अलिबाग दि. 12:- (जिमाका)   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन        झालेल्या   ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टया महत्वाची असलेल्या 28 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी चालू वर्षासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाड येथे दिली.            महाडमधील ऐतिहासिक चवदार तळयाचे सुशोभिकरण व  शाहू महाराज सभागृह नुतनीकरणसाठी प्रत्येक...