Posts

ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महावितरणच्या सात उपकेंद्रांचे लोकार्पण

Image
अलिबाग ,( जिमाका ) दि .23:- राज्याचे ऊर्जा , नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना . श्री . चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते   पनवेल तालुक्यातील महावितरणच्या सात उपकेंद्रांचे लोकार्पण संपन्न झाले . डिजिटल तंत्रज्ञांच्या माध्यमाने नवीन पनवेल मधील खांदा कॉलनीच्या सेक्टर ६ मध्ये असलेल्या श्रीकृपा हॉल येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला .  पनवेल तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण ने सात उपकेंद्रांची उभारणी केली असून आता यापुढे पनवेल परिसराचा विजेचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यात आलेला आहे . या सात उपकेंद्रात ३३ / ११ केव्ही रोडपाली , ३३ / ११ केव्ही नवीन पनवेल , २२ / ११ केव्ही तळोजा पंचानंद , २२ / ११ केव्ही बोकड वीरा , ३३ / ११ केव्ही करंजाडे , २२ / २२ केव्ही नावडा स्विचिंगन स्टेशन व ३३ / २२ केव्ही टी . एस . रेहमान या उपकेंद्रांचा समावेश आहे . या उपकेंद्रांमुळे पनवेल तालुक्यातील ग्राहकांना लाभ होणार आहे . यावेळी पनवेल महानगर पाल...

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

    अलिबाग,दि.23(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  प्रकाश महेता हे  गुरुवार दि.24 रोजी जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.24 ऑगस्ट 2017 रोजी  दुपारी एक वाजता घाटकोपर निवासस्थान येथून अलिबागकडे प्रयाण.दुपारी पावणे चार वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन. 3वा50मिनिटांनी वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.सायंकाळी चार वाजता आगमन व अवयवदान अभियान जनजागृती बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग. सायंकाळी  5वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.23:-   नेहरू युवा केंद्र, अलिबाग - रायगड (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळाला "उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार" ने गौरविण्यात येते. यावर्षी देखील या पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांनी केले आहे.                   रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत व नेहरू युवा केंद्रासोबत सलंग्न युवा मंडळांनी दि. 1 एप्रिल 2016 ते दि. 31 मार्च 2017 या कालावधी   दरम्यान केलेल्या सामाजिक, साक्षरता, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरण, व्यावसायिक प्रशिक्षण, हुंडा निर्मूलन, वनीकरण, आरोग्य  आणि कुटुंब कल्याण इत्यादी सोबत जी युवा मंडळे स्थानिक आणि राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यावर कार्यक्रम घेत आहेत. तसेच वेगवेगळ्या स्तरांवर विविध विभाग आणि संस्थांशी समन्वय साधून समाजातील विकास, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर विकासात्मक कार्यक्रमांत पुढाकार घेत आहेत अशा कामाची माहि...

पनवेल येथील 38 व्यावसायिकांविरुद्ध कारवाई ग्राहकांना तक्रारी करण्याचे आवाहन

        अलिबाग,(जिमाका)दि.23:-   अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत वैध मापन शास्त्र अधिनियम 2009     व त्या अंतर्गत नियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. माहे एप्रिल 2017 ते आजतागायत पनवेल महानगर पालिकाक्षेत्रात दुध,शितपेय इ.आवेष्टीत वस्तूंची जादा दराने विक्री केल्याबद्दल 32 व किंमतीत खाडाखोड केल्याबद्दल 6 व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र अलिबाग जि. रायगड श्री. सि.सा. कदम   यांनी दिली आहे.   अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, या मंत्रालयीन विभागाच्या अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत वैध मापन शास्त्र अधिनियम 2009     व त्या अंतर्गत नियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. या कायद्या अंतर्गत प्रामुख्याने व्यापारी व औद्योगिक आस्थापनाकडे वापरात असलेली वजने मापे यांची नियतकालीक पडताळणी व मुद्रांकन करणे तसेच आवेष्टीत (पॅकबंद)वस्तूंवर ‍नियमानुसार उदघोषणा...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 04 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.23:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 04.79 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2500.92  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 01.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-06.00 मि.मि., पनवेल-0.20 मि.मि., उरण-17.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-08.00 मि.मि., माणगांव-05.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-02.00 मि.मि., पोलादपूर-01.00, म्हसळा-09.40मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-11.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 76.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 04.79 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   80.55 % इतकी आहे. 00000