Posts

शेततळ्यातील मत्स्यसंगोपन करी समृद्ध जीवन

            अलिबाग,(जिमाका)दि.26:-   एकीकडे भरपूर पर्जन्यमान,  सुपिक जमीन, मोठा समुद्र किनारा अशी लाभलेली निसर्गसंपदा आणि दुसरीकडे केवळ खरिपात होत असलेली पारंपारिक भात शेती आणि त्यातून शेतकऱ्यांना  मिळणारे तुटपुंजे उत्पन्न. अशी विसंगती. उपलब्ध निसर्गसंपदेचा आणि मेहनती शेतकऱ्यांच्या क्षमतेचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने 'आत्मा' प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात शेततळी करुन त्यात मत्स्य संगोपन करण्यास प्रवृत्त केले. त्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत. कृषि हवामानानुसार रायगड जिल्हा हा पर्जन्यमान असलेला जिल्हा असुन जांबा दगड विरहित जमिन व समुद्र सपाटीपासून सुपीक वालुकामय जमिन असलेला जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी   3000 मि.मि पाऊस पडतो. रायगड जिल्हात   220 किलोमीटर किनारीपट्टी लाभलेला जिल्हा असुन तो उत्तेकडून दक्षिणेकडे निमुळता झालेला आहे.                ...

एचआयव्ही संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश

अलिबाग, जि. रायगड, दि.27 -   एचआयव्ही संसर्ग आणि त्यामुळे होणारा एडस हा असाध्य आजार, ही 1990 च्या दशकातील स्थिती आता राहिलेली नाही. एडस बाबत होत असलेली जनजागृती, त्यामुळे लोकांचे होणारे आरोग्यविषयक प्रबोधन, शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या  मोफत आरोग्य व उपचार सुविधा यासगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमाण घटले आहे. ही विशेष बाब. एचआयव्ही बाधीत गरोदर मातांकडून बाळाला होणारा संसर्ग रोखण्यात तर  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पुर्ण यश आले आहे, हे उल्लेखनीय. मागील चौदा वर्षाचा (सन 2003 ते 2016)अभ्यास करता सन 2003 मध्ये 827 गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेश व तपासणी केली असता त्यामध्ये 6(0.7) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून आले. सन 2016 मध्ये एकूण 44052 इतक्या गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता त्यामध्ये 24(0.05 टक्के) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून आले. तसेच गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणारा एचआयव्ही संसर्गाला प्रतिबंध करण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला 100 टक्के यश आलेले आहे. आज हे प्रमाण शून्यावर आल...

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,दि.27(जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी   रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.1 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी एक वाजता मौजे मुलूंड,सर्व्हे नं.121-123,मराठा मंडळ हॉल जवळ, 90 फोर्ट रोड,मुलूंड(इ.)मुंबई येथून रोहा कडे प्रयाण. दुपारी 3.वाजून 30 मिनिटांनी रोहा येथे आगमन.सायंकाळी पाच वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण. 000000

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,दि.27(जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी   रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.1 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी एक वाजता मौजे मुलूंड,सर्व्हे नं.121-123,मराठा मंडळ हॉल जवळ, 90 फोर्ट रोड,मुलूंड(इ.)मुंबई येथून रोहा कडे प्रयाण. दुपारी 3.वाजून 30 मिनिटांनी रोहा येथे आगमन.सायंकाळी पाच वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण.

एचआयव्ही संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश

अलिबाग, जि. रायगड, दि.27 -   एचआयव्ही संसर्ग आणि त्यामुळे होणारा एडस हा असाध्य आजार, ही 1990 च्या दशकातील स्थिती आता राहिलेली नाही. एडस बाबत होत असलेली जनजागृती, त्यामुळे लोकांचे होणारे आरोग्यविषयक प्रबोधन, शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या  मोफत आरोग्य व उपचार सुविधा यासगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमाण घटले आहे. ही विशेष बाब. एचआयव्ही बाधीत गरोदर मातांकडून बाळाला होणारा संसर्ग रोखण्यात तर  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पुर्ण यश आले आहे, हे उल्लेखनीय. मागील चौदा वर्षाचा (सन 2003 ते 2016)अभ्यास करता सन 2003 मध्ये 827 गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेश व तपासणी केली असता त्यामध्ये 6(0.7) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून आले. सन 2016 मध्ये एकूण 44052 इतक्या गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता त्यामध्ये 24(0.05 टक्के) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून आले. तसेच गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणारा एचआयव्ही संसर्गाला प्रतिबंध करण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला 100 टक्के यश आलेले आहे. आज हे प्रमाण शून्यावर आले ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.06 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.27:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.06 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3532.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग-0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-22.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-2.20मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 49.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.06 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   112.40 टक्के इतकी आहे. 00000

ऑक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन मंगळवार दि.3 रोजी

अलिबाग,(जिमाका)दि.26:-   जिल्हास्तरीय   लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु ऑक्टोबर-2017 मध्ये पहिल्या सोमवारी,दि.2ऑक्टोबर 2017 रोजी महात्मा   गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणारा लोकशाही दिन पुढे येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात   होईल. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या तक्रारी लोकशाही दिनात करावयाच्या आहेत त्यांनी आपल्या तक्रारींसह दि.3ऑक्टोबर रोजी  उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी केळविले आहे.