Posts

सधन कुक्कुट विकास गटातून कुक्कूटपालनाला चालना

रायगड जिल्ह्यातील एकूण 15 सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी  सन 2018-19 पासून टप्या टप्याने स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.  या योजने अंतर्गत खालीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1) जमीन- 2500 चौ.फुट (1000 चौ.फुटाचे 2 शेड) खाद्य, अंडीसाठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र्य खोल्या. जमीन व खोल्या लार्भीच्या स्वत:च्या मालकीच्या असतील. 2) प्रति 1000 चौ.फुटाच्या 2 पक्षीगृहाचे बांधकाम,स्टोअर रुम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत चार लाख रुपये. 3) खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण, सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत पन्नास हजार रुपये. 4) अंडी ऊबवणूक यंत्र(mini setter cum hatcher) सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत एक लाख 80 हजार रुपये. 5) 1000 एकदिवसीय मिश्र (नर + मादी) पिले प्रति पक्षी रु.60/- सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत साठ हजार रुपये. 6) 20 आठवड्यांची अंड्यावरील 500 पक्षी (नर + मादी) प...

वाहन योग्यता तपासणीसाठी ऑनलाईन अपॉईन्मेंट

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ज्या वाहन धारकांना आपल्या वाहन योग्यतेसंदर्भात तपासणी करुन वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावयाचे असते अशा वाहनधारकांच्या वेळेत बचत व्हावी व त्यांना योग्य सुविधा मिळावी यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन अपॉईन्मेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या वाहनधारकांनी आपली वेळ निश्चित करुन वाहन व कागदपत्रांसह तपासणीसाठी हजर रहायचे आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल परिवहन यांनी कळविले आहे की,   उच्च न्यायालयाच्या 18 फेब्रुवारी 2016 व त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी याबाबतच्या कार्यपध्दती बाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वेळोवळी निर्देश जारी केलेले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहन धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्य प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी एनआयसी ने विकसीत केलेल्या Vhan-4.0 या संगणक प्रणालीवरील https://parivahan.gov.in या वेब साईटवर अपॉईटम...

यशकथा :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : पुन्हा जोमाने शेतीकडे….

Image
अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका)-   न फेडलेल्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी मंगेश पाटील हे आपल्या शेतीत राबत होते. निसर्गाची अवकृपा, त्यामुळे तोंडचा घास हिरावून घेतला जात होता. शेती करण्यासाठीचे मनोबल संपले होते. परंतू शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे डोक्यावरच कर्जाचं ओझं उतरलं आणि आता पुन्हा नव्या जोमाने पावले शेतीकडे वळली, हे मनोगत आहे शेतकरी कार्ले येथील शेतकरी मंगेश पाटील यांचे. मंगेश पाटील यांनी शेतीच्या कामासाठी  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतलं. कर्जाचे हप्ते फेडण्याचे प्रयत्न सुरु होते. पण खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचं नुकसान होत होतं. बँकेकडून  घेतलेलं कर्ज फेडण्याची आर्थिक समस्या निर्माण झाली. झालेल्या नुकसानीमुळे  कुटूंबावर आर्थिक संकट ओढावले, अशा वेळी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मंगेश पाटील हे एक. आज त्यांचे कुटूंब कर्जमाफीमुळे पुन्हा शेती करण्यास...

मतदार जागृतीसाठी निवडणूक साक्षरता क्लब :जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात होणार स्थापना

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   निवडणूक विषयक साक्षरता वाढविण्यासाठी, मतदारांमध्ये मतदान विषयक जागृती निर्माण करुन  स्वंयप्रेरणेने होणारे मतदान वाढविण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेविषयी जनमानसात माहिती पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.   या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक साक्षरता जिल्हा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नव मतदारांमध्ये निवडणूक व मतदान या विषयी जागृती व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 30 टक्के शाळा व 30 टक्के महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या-त्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल. हे शिक्षक त्यांच्या महाविद्यालयातील नव मतदारांना मतदार नाव नोंदणी, मतदान ओळखपत्र, निवडणूक विषयक विविध अर्ज, त्यांचे प्रयोजन इ. बाबत मार्गदर्शन करत...

प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   दैनंदिन व्यवहारामध्ये प्लास्टीक पिशवीचा (कॅरी बॅग) वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा. नागरीकांनी हि जागरुकता ठेवल्यामुळे प्लास्टिक कॅरी बॅग मुळे निर्माण होणाऱ्या   प्रदूषणास आळा बसेल,   असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   रायगड जिल्हा महिला बचत गट सक्षमीकरण फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या कापडी पिशवीच्या स्टॉलचे उद्घघाटन प्रसंगी   ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्लास्टीक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा.   एकदा निर्माण झालेले प्लास्टीक हे कधीच नष्ट होत नाही.  ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात जाऊन ते जलचर व अन्य प्राण्यांच्या खाण्यात येतात. त्यामुळे प्राण्यांना त्रास होतो.     प्लास्टीक कचरा ही आज सार्वत्रिक समस्या आहे.  हा कचरा  आपल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये अडकून राहतो.  त्यामुळे प...

स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प :विभागीय कृषि सहसंचालकांची वरसई येथे भेट

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प अंतर्गत वनराई शेतकरी उत्पादक कंपनी, वरसई येथे विभागीय कृषि सहसंचालक विकास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कंपनीस उत्पादित भाजीपाला संकलन व विक्री करण्यासाठी व्हॅन प्रदान करण्यात आली. जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प सन 2013-14 पासून जिल्ह्यामधील अलिबाग, पेण, खालापूर व माणगांव या चार तालुक्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी गटांची निर्मिती करणे व त्यांचे शेतकरी उत्पादक कंपनीत रुपांतरीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आजतागायत 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. एम.ए.सी.पी.  अंतर्गत मंजूर व्यवसाय विकास आराखड्यानुसार वनराई शेतकरी उत्पादक कंपनी वरसई ता.पेण या कंपनीच्या संचालकांना विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे विकास पाटील यांचे हस्ते भाजीपाला संकलन व थेट विक्रीसाठी व्हॅन देण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) मंगेश डावरे, प्रकल्प संचालक (आत्मा-2) डी.एस.चव्हाण, तालुका कृषि अधिकारी, पेण,एस.आर.निंबाळकर, तंत्र अधिकारी, ठाणे श्री.ठमके, कृ...

आंबा मोहोर संरक्षणासाठी 'हॉर्टसॅप' :वेळापत्रकानुसार फवारणी करण्याचे आवाहन

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16 :- कोकणातील आंबा हे महत्त्वाचे फळ पिक.  या पिकावर सध्या  हवामानातील बदलांमुळे किड रोगांची शक्यता लक्षात घेता आंबा पिक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात 'हॉर्ट सॅप'  राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पामार्फत प्राप्त सुचनांनुसार शेतकऱ्यांसाठी आंबा पिक फवारणीसाठी वेळापत्रक दिले असून त्यानुसार दिलेल्या औषधांची फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत 1 डिसेंबर पासून आंबा पिक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाद्वारे नियमित निरिक्षणे घेऊन किड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे. दिवसेंदिवस हवामानामध्ये होणार अचानक बदल ह्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण व कोंदट हवामान राहिल्यास आंबा पिकावरील तुडतुडे किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.मोहोरावरील तुडतुडे मोहोरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतात. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीराव...