कुपोषण विरोधात झुंजतोय सेवाभावाचा ‘अविनाशी’ वसा
अलिबाग,जि. रायगड (डॉ. मिलिंद दुसाने) दि.8 - लहान बालकांमधले कुपोषण दूर करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. परंतू एक बालरोग तज्ज्ञ म्हणून आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग कुपोषणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी करावा, या विचाराने बार्शी जि. सोलापूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश लुकडे हे स्वखर्चाने दर शनिवार रविवारी कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपली सेवा देत आहेत, ते ही विनामूल्य. सेवाभावाचा हा ‘अविनाशी’ वसा हा अन्य डॉक्टर्स व समाजघटकांनी अनुकरण करण्यासारखाच आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास दिला प्रतिसाद डॉ. अविनाश लुकडे, एम.डी.(बालरोग) यांचे बार्शी जि. सोलापूर येथे सिद्धीविनायक लहान मुलांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या भागात ते सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. भरपुर अनुभव. मध्यंतरी त्यांच्या वाचनात एका इंग्रजी दैनिकात रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे एक आवाहन वाचनात आले. हे आवाहन होते कर्जत,खालापूर भागात बालकांमध्ये असलेल्या कुपोषणाच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी खाजग...