Posts

भात पिकावरील खोडकिड प्रतिबंधासाठी उपाययोजना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 कर्जत तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 9170 हेक्टर वर भात पिकाची लावणी झाली असून आतापर्यंत 3500 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.   सद्यस्थितीत भात पिकाची जोमदार वाढ झाली असून भातपिक वाढीच्या अवस्थेत आहे.   मर्यादित ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादूर्भाव झाला आहे परंतु पिक आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे.   कृषि विभागामार्फत यासंदर्भात cropsap (कीड रोग सर्वेक्षण व सल्ला पध्दत) नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात करण्यात आली असून कर्जत तालुक्यात 23 कृषि सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत दिवसाआड कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जातात.   कोणतीही कीड तसेच रोग आढळल्यावर संबधित शेतकरी यांना त्यासंबंधी उपाययोजना सांगितल्या जातात.   या प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रमुख किडी व रोगांचे भित्तीपत्रके लावण्यात आली असून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांचेमार्फत कीड व रोगांची ओळख व त्यासंबधीच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु आहे.   खोडकिड्यांच्या संदर्भात कर्जत तालुक्यात भात पिकात 2225 ए...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ; 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार, तीस हजार, वीस हजार, दहा हजार रोख रक्कम व शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.             राज्यस्तरीय प्रत्येक एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांनी प्रत्येक रुपये पंचवीस हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्...

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागितले

अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) -   केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता नामांकने मागविली आहेत.    आवश्यक माहिती व अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार (वैयक्तिक)- सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी).   युवा पुरस्कार (संस्था) – प्रति संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.    जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत.   तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क साध...

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) - राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि. 4   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. मंगळवार दि.4 रोजी सकाळी 11 वा. खोपोली येथे आगमन व रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ : राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह खोपोली.   दुपारी एक वा. खोपोली येथून ऐरोलीकडे प्रयाण. 00000

लोकराज्य वाचक अभियान : लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय- डॉ. अजित गवळी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-   राज्य शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिकात विविध शासकीय योजनांची अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती दिलेली असते. हे मासिक अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. ही माहिती वाचून आपल्या ज्ञानात वाढ होते, म्हणूनच लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज येथे केले. लोकराज्य वाचक अभियानांतर्गत अलिबाग येथील डोंगरे हॉल येथील सार्वजनिक वाचनालयात   वाचकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने हे ही उपस्थित होते. यावेळी   उपस्थित मान्यवरांचे लोकराज्य अंक भेट देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. गवळी वाचकांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की, आपले ज्ञान अद्यावत करण्यात लोकराज्यच्या माहितीचा खूप उपयोग होतो. स्पर्धा परीक्षेसाठीही ते आवश्यक असते.   असा हा लोकराज्य प्रत्येकाने अवश्य वाचायला हवा. आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना वाचवयास सांगा, असे आवाहन डॉ. गवळी यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी वळ...

इंडिया पोस्ट पेमेंट बँक घरापर्यंत बँकसेवा पोहोचवून पोस्टाचं नातं होणार अधिक दृढ -ना.अनंत गिते

Image
अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) - देशभरात पोहोचलेल्या पोस्टाच्या   1 लाख 55 हजार टपाल कार्यालयाच्या विस्तीर्ण शाखांमार्फत ग्रामीण जनतेशी जोडलेले टपाल विभागाचे नाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे बँकसेवा थेट घरापर्यंत पोहोचवून अधिक दृढ होईल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गिते यांनी आज येथे व्यक्त केला. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शुभारंभानिमित्त अलिबाग येथील मुख्य पोस्ट ऑफीस येथे आयोजित समारंभात ना.गिते बोलत होते. यावेळी आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲङ आस्वाद पाटील, नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे, अलिबाग पोस्ट ऑफीस अधिक्षक व्ही.सी.घोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.    यावेळी ना.गिते यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले.   तसेच बँकेच्या खातेधारकांना क्यू आर कोड कार्डचे   वितरणही करण्यात आले. आपल्या संबोधनात ना.गिते म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरापर्यंत बँकसेवा पोहोचविण्याचा प्रशंसनीय प्रयत्न आहे.   या बँकेसे...

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी मागितले अर्ज

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता नामांकने मागविली आहेत.   आवश्यक माहिती व अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार (वैयक्तिक)- सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी).  युवा पुरस्कार (संस्था) – प्रति संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.   जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क सा...