Posts

वादळातील नुकसानीचे पंचानामे तातडीने करा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे पेण येथील बैठकीत निर्देश

Image
अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका) - जिल्ह्यात नुकतेच वादळामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन   नुकसआनग्रस्तशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी दिले. ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे नगरपरिषद सभागृहात   आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार धैर्यशील पाटील,   प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड,   तहसिलदार अजय पाटणे,   उपनगराध्यक्ष जयवंत गुरव,   पेण न.पा. मुख्याधिकारी अर्चना दवे, नगरसेवक शोमेर पेणकर आदी तसेच तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   यावेळी वादळी पावसात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने महसूल, कृषि, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आदी विभागांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेला सोयी सुविधा वेळत पुरविण्यात याव्या, असेही त्यांनी यावेळी उपस्थित ...

कळंबोली येथे बुधवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.6- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व सक्षम स्कील ॲकेडमी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केएलई संस्थेचे सायन्स व कॉमर्स कॉलेज यांच्या सहकार्याने   बुधवार दि.10 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळात केएलई संस्थेचे सायन्य व कॉमर्स कॉलेज सेक्टर क्र.1 कळंबोली ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना दहावी पास-नापास, बारावी पास, आयटीआय फिटर, पदविकाधारक, डी.फार्म., बी.फार्म., कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमबीए, एमसीए, बीटेक, वाहन चालक अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. सदर मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून   नोंदणी   व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराडील नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅ...

‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

Image
अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका) - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे गोपाळकृष्ण सभागृहात आयोजित कार्यक्रमात हे अनावरण करण्यात आले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आ. प्रविण दरेकर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. लोकराज्यच्या माहे ऑक्टोबरच्या विशेषांकात   महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त परिवर्तन ह्या सूत्राने महाराष्ट्रात होत असलेल्या   परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अ...

ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे रुपांतर करण्यासाठी अर्थसहाय्य मस्त्यव्यवसाय विभागाची नाविन्यपूर्ण योजना

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसायाचा विकास व त्यास चालना मिळण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच केंद्र पुरस्कृत निलक्रांती कार्यक्रमांतर्गत मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेखाली सागरी मत्स्यव्यवसायाचा विकासाच्या दृष्टीकोनातुन पुढील नावीन्यपुर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. योजनेचे नाव:- मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेअंतर्गत ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे        रुपांतर करणे         ट्रॉलिंग पद्धतीची   मासेमारी नौका खोल समुद्रातील स्त्रोतात ठराविक पद्धतीने मासेमारीसाठी रुपांतरीत करणे   Integrated Development and management of Fisheries- Conversion of Trawlers into Resource Specific Deep-sea Fishing Vessels अर्थसहाय्याचे स्वरुप:- 1.या योजनेसाठी केंद्र शासनाकडुन 100 टक्के अर्थसहाय्य रु.15.00 लाखाच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. 2.नौका तपासणी प्रगती अहवालानुसार अर्थसहाय्य तीन हफ्त्यात द...

मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समिती बैठक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - मुद्रा बॅंक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरुणांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार,    तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी    आज येथे दिले. जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,    सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार व उद्योजकता विकास एस.जी.पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद निंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, अशासकीय सदस्य कल्पना राऊत, मिलिंद पाटील, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा बॅंक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बॅंका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक ...

रायगड जिल्ह्यासाठी नवीन मतदान यंत्रे दाखल

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यासाठी   नवीन मतदान यंत्रे ( कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट) दाखल झाळे आहेत. लवकरच व्हीव्हीपॅट (VVPATs) मशिन्सही दाखल होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.   भारत निवडणूक आयोगामार्फत रायगड जिल्ह्यात 3326 कंट्रोल युनिट (C.U.), 5721 बॅलेट युनिट (B.U.) प्राप्त झाले आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारपासून (दि.4) सुरु झाली. यावेळी राजकीय पक्षांचे   प्रतिनिधीही उपस्थित होते.   या प्रथमस्तरीय तपासणीबाबत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही अवगत करण्यात आल्याचे   उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी कळविले आहे. 00000

मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समिती बैठक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - मुद्रा बॅंक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरुणांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार,  तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  आज येथे दिले. जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार व उद्योजकता विकास एस.जी.पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद निंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, अशासकीय सदस्य कल्पना राऊत, मिलिंद पाटील, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा बॅंक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बॅंका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत मत मांडण्य...