Posts

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे रविवार दि.17 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.17 रोजी सायं. साडेपाच वा.जे.एन.पी.टी. उरण येथे आगमन व शिवसमर्थ स्मारकाचे अनावरण व जे.एन.पी.टी. मधील विविध प्रकल्पांच्या भूमीपुजन व उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.   सायं.साडे सात वा.जे.एन.पी.टी.   येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपुजन अलिबागचे प्रशिक्षण केंद्र आदर्शवत ठरावे- ना. महादेव जानकर

Image
  अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका) - महाराष्ट्राला 720 कि.मी चा सागरी किनारा लाभला असतांनाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छिमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते, त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय   मंत्री ना. महादेव जानकर यांनी आज येथे केले. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय   प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन आज ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अलिबाग येथे कोळीवाडा परिसरात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगल...

वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेची बैठक 21 रोजी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- राज्य सरकारी आहरण व संवितरण अधिकारी आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेत सहभागी होणारे व झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेच्या अनुषंगाने गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी एमडीइंडिया (TPA) यांच्यासमवेत जंजिरा हॉल अलिबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.    सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील जुलै 2018 ते जून 2019 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज इ.मुल्ला यांनी केले आहे. 00000

किसान क्रेडीट कार्ड वाटप योजना शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.     या योजनेस पात्र शेतकऱ्यांनी   आपल्या नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयांना भेट देऊन त्यांच्याकडील असलेला अर्ज भरुन तो संबंधित बँक शाखेकडे देण्यात यावा. या अर्जासोबत शेतकऱ्यांनी त्यांचा स्वत:चा आधारकार्ड, 7/12 उतारा, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.    ज्या शेतकऱ्यांचे कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडलेले नाही त्यांनी सदरील अर्ज भरुन नजिकच्या बँक शाखेत आपले खाते उघडणे आवश्यक आहे.   या योजनेच्या लाभासाठी आवश्यक   असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. 00000

वावंजे,शिरवली,सोनारी ग्रा.पं. कार्यक्षेत्रात मनाई आदेश

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत वावंजे व शिरवली ग्रामपंचायत तसेच न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत सोनारी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून दि.24 रोजी मतदान व दि.25 रोजी मतमोजणी होणार आहे.   या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी वर नमूद ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात बुधवार दि. 27 च्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.   पोलीस उप आयुक्त विशेष शाखा नवीमुंबई पंकज डहाणे यांनी हे आदेश निर्गमित केले असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 00000

केंद्रीय भूतल परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हादौरा

  अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका) -केंद्रीय भूतल परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री ना. नितीन गडकरी हे रविवार दि.17 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि.17 रोजी सायंकाळी साडेपाच वा. जेएनपीटी उरण येथे आगम व दास्तान फाटा उरण कडे प्रयाण, सायं. पावणे सहा वा. दास्तान फाटा उरण येथे आगमन व सायं.6 वा. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मारक, पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 ते 9   जेएनपीटी येथे राखीव, रात्री 9 वा. जेएनपीटी येथून बोटीने गेट वे ऑफ इंडीया कडे प्रयाण. 00000

संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) -येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात   संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रोहयो उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी अभिवादन केले. यावेळी तहसिलदार के.डी. नाडेकर   तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 00000