जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 131 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 131.78 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 606.41 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 61.00 मि.मि., पेण-190.00 मि.मि., मुरुड-116.00 मि.मि., पनवेल-166.20 मि.मि., उरण-95.00 मि.मि., कर्जत-106.80 मि.मि., खालापूर-70.00 मि.मि., माणगांव-144.00 मि.मि., रोहा-164.00 मि.मि., सुधागड-80.00 मि.मि., तळा-229.00 मि.मि., महाड-62.00 मि.मि., पोलादपूर-75.00, म्हसळा-185.00 मि.मि., श्रीवर्धन-210.00 मि.मि., माथेरान-154.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2108.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 131.78 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 19.45 टक्के इतकी आहे. 0000