Posts

चक्रीवादळामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा तातडीने सुरु करण्यास शासन कटिबध्द ज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अलिबाग,जि.रायगड, दि.10 (जिमाका) :   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज केले.    निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात   उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील आदि उपस्थित होते.              राज्यमंत्री श्री.तनपुरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण क...

विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी शासन लवकरच घोषित करणार सकारात्मक निर्णय --कृषी मंत्री दादाजी भुसे

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.10 (जिमाका) : निसर्ग या चक्रीवादळामुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानी पासून तर शेतीचे, नारळाच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घोषित करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा दिवसभर पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.   यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदि उपस्थित होते, उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नुकसानीची सविस्तर आकडेवारी पंचनाम्यासह लवकरात लवकर सादर करण्यात यावी.  ...

निसर्ग चक्रीवादळात झाडे पडल्याने बंद पडलेले रस्ते प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाहतुकीसाठी खुले

अलिबाग,जि.रायगड, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील दि. 03 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात झाडे पडल्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यात बंद पडलेले रस्ते प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. दि. 03 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनेक झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे विवधि तालुक्यांमधील बरेचसे रस्ते या पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीसाठी बंद झाले होते. मात्र जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत मदत कार्य पोहोचण्यासाठी, दळणवळणासाठी हे बंद पडलेले रस्ते खुले करणे, यास प्राधान्य देऊन उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांना तातडीची जबाबदारी सोपविली. त्यानुसार उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी कार्यवाहीस तात्काळ प्रारंभ केला.   त्यांच्यासह कार्यकारी अभियंता (अलिबाग) श्री. मोरे, कार्यकारी अभियंता (पनवेल) श्री.शेरवाजे, कार्यकारी अभियंता (महाड) श्री.बहिर, सर्व प्रांताधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर, जिल्हा प्रशासन अधिकारी महेश चौधरी, तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी, त्यांचे इतर...

निसर्ग चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली मोबाईल नेटवर्क सेवा बहुतांश भागात पूर्ववत सुरु उर्वरित भागातील नेटवर्क सुरु करण्यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु

अलिबाग,जि.रायगड, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील दि. 03 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यात विस्कळीत झालेल्या विविध सर्व्हीस प्रोव्हायडर नेटवर्कची सेवा सुरु झाली असून त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे- बीएसएनल नेटवर्क अलिबाग, पेण, नागोठणे-रोहा, म्हसळा, खोपोली-खालापूर, माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरुड या तालुक्यात सुरु झाले आहे तर पोलादपूर, सुधागड, तळा, कर्जत या तालुक्यात नेटवर्क सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एअरटेल नेटवर्क महाड,पोलादपूर, रोहा,कर्जत,खोपोली-खालापूर, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या तालुक्यात सुरु झाले आहे तर दासगाव व तुडील येथील काम सुरु आहे. जिल्ह्यात जिओ नेटवर्कचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे तर आयडिया नेटवर्कच्या एकूण 1 हजार 500 साईटस् पैकी 1 हजार 400 साईटस् सुरु झाल्या आहेत. उर्वरित 100 साईटस् चे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तथा समन्वयक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष (निसर्ग चक्रीवादळ) श्रीमती वैशाली माने यांनी दिली आहे. 0000

शो मस्ट गो ऑन...! वादळाच्या तडाख्यात उध्वस्त झालेली बाग जिल्हा नियोजन विभागाने श्रमदानातून पुन्हा केली उभी

अलिबाग,जि.रायगड,दि.10, (जिमाका)- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन कार्यालयाने उभ्या केलेल्या छोट्याशा बगीच्यालाही बसला. मात्र जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुनील जाधव आणि त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुणाचीही वाट न पाहता स्वतः श्रमदान करून हा बगीचा पुन्हा उभा करण्याचा संकल्प केला आणि ते कामालाही लागले.       असे आदर्शवत आणि अनुकरणीय काम सर्वांनाच प्रेरणादायी असे आहे. जिल्हा नियोजन कार्यालयाचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव   यांच्यासह परिचय देसाई, मोहनलाल वाडिले, प्रदीप कदम , श्री.शेख, राहुल गायकवाड, नरेंद्र गावडे, पल्लवी फालक, नेहा पाटील, अजिंक्य तबिब या सर्वांनी हे श्रमदान अत्यंत उत्साहाने पार पाडले आणि आपल्या बगीच्याला पुन्हा सुंदर बनविले.         याविषयी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव म्हणाले की,मानवाच्या जीवनात संकटे ही येतच असतात.मात्र आपण या संकटांना धीराने,एकजुटीने सामोरे जाऊन आपले आयुष्य मात्र शो मस्ट गो आँन याप्रमाणे पुन:श्च सुरु करणे आवश्यक आहे. म्हणूनच वादळामुळे ...

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पेण मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

अलिबाग, जि.रायगड,दि.10 (जिमाका)- निसर्ग चक्रीवादळामुळे   रायगड जिल्ह्यात   सर्वत्र   मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या,सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर   कृषी क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आलेल्या कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी पेण तालुक्यातील मौजे जिते येथील शेतकरी श्री. काशिनाथ चांगू म्हात्रे यांच्या नुकसानग्रस्त आंबा बागेची पाहणी केली.         या पाहणीवेळी श्री.काशिनाथ म्हात्रे यांच्या एकूण 0.43 हे.क्षेत्रापैकी बागेतील 17 आंब्याची झाडे व   नारळाची 8 झाडे मुळासकट उन्मळून पडली असल्याचे निदर्शनास आले.       या सर्व   नुकसानीची पाहणी कृषी मंत्री महोदयांनी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वनही केले. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या   नुकसानीबाबत शासन लवकरच योग्य तो निर्णय घेईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.       यावेळी विभागीय कृषी सहसंचालक श्री. विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अध...

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील पुष्प व्हॅली सोसायटी वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून

अलिबाग,जि.रायगड, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या पुष्प व्हॅली सोसायटी, विचुंबे, ता.पनवेल ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र आता करोना बाधित रुग्णाला रुग्णालयातून   दि.10 मे 2020 रोजी डिस्चार्ज मिळाल्याने. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तीही   अद्यापपर्यंत करोना विषाणूमुळे संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही.   त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. 0000