शो मस्ट गो ऑन...! वादळाच्या तडाख्यात उध्वस्त झालेली बाग जिल्हा नियोजन विभागाने श्रमदानातून पुन्हा केली उभी
अलिबाग,जि.रायगड,दि.10,
(जिमाका)- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील
जिल्हा नियोजन कार्यालयाने उभ्या केलेल्या छोट्याशा बगीच्यालाही बसला. मात्र
जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुनील जाधव आणि त्यांच्या सहकारी
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुणाचीही वाट न पाहता स्वतः श्रमदान करून हा बगीचा पुन्हा
उभा करण्याचा संकल्प केला आणि ते कामालाही लागले.
असे
आदर्शवत आणि अनुकरणीय काम सर्वांनाच प्रेरणादायी असे आहे. जिल्हा नियोजन
कार्यालयाचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह
परिचय देसाई, मोहनलाल वाडिले, प्रदीप कदम , श्री.शेख, राहुल गायकवाड, नरेंद्र
गावडे, पल्लवी फालक, नेहा पाटील, अजिंक्य तबिब या सर्वांनी हे श्रमदान अत्यंत
उत्साहाने पार पाडले आणि आपल्या बगीच्याला पुन्हा सुंदर बनविले.
याविषयी
जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव म्हणाले की,मानवाच्या जीवनात संकटे ही येतच
असतात.मात्र आपण या संकटांना धीराने,एकजुटीने सामोरे जाऊन आपले आयुष्य मात्र शो
मस्ट गो आँन याप्रमाणे पुन:श्च सुरु करणे आवश्यक आहे. म्हणूनच वादळामुळे उध्वस्त
झालेली ही बाग आम्ही सर्वांनी मिळून सुंदर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्हा
माहिती कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले.
000000
Comments
Post a Comment