Posts

माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- माणगाव ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.    यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी, श्री.सुभाष केकाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राऊत, माणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००

मापगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.15(जिमाका):- ग्रुप ग्रामपंचायत मापगाव, ता.अलिबाग येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार श्री.मधुकर ठाकूर, श्री.प्रवीण ठाकूर, श्री.सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, गट विकास अधिकारी, पं.स.,अलिबाग सौ.दीप्ती पाटील, मापगाव सरपंच श्रीमती अनिता थळे, ग्रामसमिती सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ०००००००

अनाथ बालकांना शालेय साहित्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-    पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे भेट देऊन तेथील निराधार, आई-वडील नसलेल्या बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप केले. या बालग्राम मध्ये 157 विद्यार्थी आहेत. यावेळी पालकमंत्री महोदयांनी येथील बालकांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ,  संस्थेचे संचालक राकेश सिन्हा, सहाय्यक संचालक शिवरुद्र लुपने, व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 000000

रोहा ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- रोहा ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते   डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.     यावेळी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव आणि मधुकर पाटील, अमित उकडे,   रोहा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-    ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त व पोषण मूल्य असलेल्या असून त्या नामशेष होऊ नयेत आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक लाभ व्हावा, म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 52 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सूचित केले की, या रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचा उपक्रम स्वागतार्ह असून या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व महिला शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही   प्रोत्साहन म्हणून कौतुक केले. या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांड...

जिल्हा परिषदेत अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन संपन्न

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-   रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये   जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी , सभापती गिता जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन आज करण्यात आले. या प्रसंगी महिला व बालविकास भवनातील जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.एस. वाघमारे , महिला आर्थिक महामंडळाच्या कॅम्प मॅनेजर श्रीमती शमीम चौधरी व महिला आयोग प्रतिनिधी ॲड. शितल ठाकूर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये "महिला व बालविकास भवन " आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी श्री.मंडलिक यांनी दिली आहे. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15(जिमाका) :-   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 73   व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी श्रीम.शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उ पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा,   जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 73   व्या वर्धाप...