Posts

मुरुड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांचे फलित

    अलिबाग,जि.रायगड, दि.19   (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.                रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्याकडे पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. या   पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना दिल्या.               यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.   ...

कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणीकार्ड आधार लिंक करा

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने लिंक करुन नोंदणीतील माहिती दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत अद्यावत   करणे आवश्यक आहे. याकरीता सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणीमध्ये आपल्या आधार कार्ड नोंदणी क्रमांकाचा   समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली आपली सर्व माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या   https:// rojgar.mahaswayam. gov.in या वेबपोर्टलवर दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत अद्ययावत करावी. तसेच वेबपोर्टलवरील उपलब्ध असलेली नोकरी/व्यवसाय इ. बाबतची माहिती प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी वेबपोर्टलवर लॉग-इन करावे. ही माहिती दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील आपली नोंदणी रद्द करण्यात येईल. वेबपोर्टलवरील   माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास ...

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

  अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्याकडून प्राप्त झालेल्या नद्यांचा पाणी पातळी दैनंदिन तालुकानिहाय अहवाल पुढीलप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.70 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.00 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.80 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.10 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.90 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.43 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 708.72 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 28.00 मि.मी., पेण-60.00 मि.मी., मुरुड-31.00 मि.मी., पनवेल-57.20 मि.मी., उरण-44.00 मि.मी., कर्जत-48.40 मि.मी., खालापूर-75.00 मि.मी., माणगाव-85.00 मि.मी., रोहा-55.20 मि.मी., सुधागड-65.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-66.00 मि.मी., पोलादपूर-79.00 मि.मी., म्हसळा-40.00मि.मी., श्रीवर्धन-40.00 मि.मी., माथेरान-78.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 918.80 मि.मी.इतके असून सरासरी 57.43 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 84.22 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगडदि.18 (जिमाका):- केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन 2020 च्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.                  दिव्यांग व्यक्तींना सन-2020 चे पुरस्कारासाठीचे अर्ज दि. 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2020 या   कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या WWW.DASABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. अर्जदारांकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण माहिती व अर्ज दि.22 ऑगस्ट 2020 पूर्वी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. हे अर्ज दि.25 ऑगस्ट 2020 पूर्वी आयुक्तालयात सादर करावयाचे आहेत.                  राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे :- उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती.    उत्कृष्ट नियुक्ती अधिक...

निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.31ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी

  अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- जिल्हा कोषागार कार्यालय,रायगड-अलिबाग येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची आहे.             यासाठी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांची माहिती मागविण्यात आली असून ती माहिती पुढीलप्रमाणे आहे--- निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचे पूर्ण नाव, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा पूर्ण पत्ता, निवृत्तीवेतनधारक प्रदान आदेश क्रमांक (PPO NO), बँकेचा तपशिल, बँकेचे नाव, शाखेचे नावे, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक (झेरॉक्स जोडण्यात यावी), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा ई-मेल आयडी असल्यास नमूद करण्यात यावा.             ही माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या to.raigad@zillamahakosh.in या ई-मेल व...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.58 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 651.29 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 17.00 मि.मी., पेण-25.00 मि.मी., मुरुड-34.00 मि.मी., पनवेल-87.60 मि.मी., उरण-18.00 मि.मी., कर्जत-47.00 मि.मी., खालापूर-31.00 मि.मी., माणगांव-37.00 मि.मी., रोहा-68.00 मि.मी., सुधागड-35.00 मि.मी., तळा-69.00 मि.मी., महाड-76.00 मि.मी., पोलादपूर-82.00 मि.मी., म्हसळा-53.00मि.मी., श्रीवर्धन-30.00 मि.मी., माथेरान-211.60 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 921.20 मि.मी.इतके असून सरासरी 57.58 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 82.43 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000