*"माझे कुटुंब- माझी जबाबदारी" कराेनाविराेधातील लढाई सक्षमपणे लढू या* *-- जिल्हाधिकारी निधी चौधरी*
अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये होत असलेली वाढ विचारात घेता यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. कराेनाविरोधातील ही लढाई आपण सर्व मिळून सक्षमपणे लढू या, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज केले. या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर,गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी दि.15 सप्टेंबर 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर 20 ते 24 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहे. या मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या (co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, SARI/ I...