Posts

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आरोग्य सुविधांसह सज्ज

  अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.10 सप्टेंबर 2021 पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर   या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होवून जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषध साठा व रुग्णवाहिकेसह सुसज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी दिली आहे.       गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे-             हमरापूर :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.दिक्षिता मोकल, मो.9028286605, आ...

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदूर्ग ना. उदय सामंत यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा. चिपळूण, जि.रत्नागिरी येथून मोटारीने   लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील डिजीटल स्टुडिओ उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)             दुपारी 3.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड येथे आढावा बैठक. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)           ...

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन अनिर्वाय

  अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिर्वाय आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्रायझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, विरतण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल, सेवा पुरवठा व इतर इ. आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेत समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा विहित नमुन्यातील अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा. तसेच एखादया कार्यालय / आस्थापना / मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही (ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कारवाई केली नाही (क) या कायदयातील तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्य...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दासगाव, ता. महाडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. दासगाव, ता. महाड येथे आगमन व रोशनी ग्रुप आयोजित पूरग्रस्तांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र, दासगाव, ता.महाड.  सकाळी 10.45 वा. दासगांव येथे अंजुमन ईमा-दादूल   मुस्लिम समाज दाभोळमार्फत पूरग्रस्तांकरिता बांधण्यात    येणाऱ्या घराचे भूमीपूजन.  सकाळी 11.00 वा.दासगाव येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण.  11.15 वा.महाड येथे आगमन व अंजुमन ईमा-दादुल मुस्लिम समाज दाभोळमार्फत महाड पूरग्रस्तांसाठी   साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ: पी.जी. सिटी हॉटेल, महाड. दुपारी 12.00 वा.महाड येथून कापडे खुर्द, ता. पो...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.71 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3015.86मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-              अलिबाग- 37.00 मि.मी., पेण- 29.00 मि.मी., मुरुड- 42.00 मि.मी., पनवेल- 19.80 मि.मी., उरण-10.00 मि.मी., कर्जत- 9.40 मि.मी., खालापूर- 17.00 मि.मी., माणगाव- 16.00 मि.मी., रोहा- 30.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा-27.00 मि.मी., महाड- 9.00 मि.मी., पोलादपूर-11.00 मि.मी, म्हसळा- 29.00 मि.मी., श्रीवर्धन- 50.00 मि.मी., माथेरान- 17.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 363.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 22.71 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी 93.77 टक्के इतकी आहे. 00000

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार इच्छुक माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे पूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी रु.10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजार चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे. विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे :- खेळातील पुरस्कार : राष्ट्रीय राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय?, घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला?, राष्ट्रीय / राज्य स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले आहे काय?, उत्कृष्ट कामगिरी/पदक मिळविल्याचे वर्तमानपत्...

एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक विधवांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   इयत्ता 10 वी व 12 वी बोडांच्या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी एका माजी सैनिक विधवेच्या पाल्याला (10 वी मधून एक व 12 वी मधून एक) रक्कम रू. 5 हजार (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) देऊन एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक विधवांनी या पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दि.10 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या (10वी मधून एक व 12 वी मधून एक) पाल्यांचे नाव जिल्ह्यामार्फत निवड समितीला पाठविण्यात येईल. यासाठी वैयक्तिक अर्ज, फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध), माजी सैनिक/विधवा पत्नीचे ओळखपत्र, 10 वी 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र,   सेवापुस्तकामध्ये पाल्याचे नाव असलेल्या पानांची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेच्या पानाची सुस्पष्ट छायांकित खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी कोडसह प्रत ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील माजी सैनि...