Posts

खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

Image
  अलिबाग,दि.16 (जिमाका):-  खालापूर तालुका महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने ई-पीक पाहणीबाबत खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन तसेच ई-पीक पाहणीचे प्रशिक्षणही देण्यात आले. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी तलाठी प्रतीक बापर्डेकर, कृषी सहाय्यक मंजुषा शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनी खालापूर तालुका प्रतिनीधी गणेश सावंत, पंकज साखरे, कोतवाल सुरेश ठोंबरे या सर्वांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी खरवई गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 00000

प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  अलिबाग,दि.16 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यामध्ये  1 लाख 74 हजार 216 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी असून 1 लाख 34 हजार 289  शेतकऱ्यांनी आधारकार्ड जोडलेले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार नुकत्याच जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या ई-केवायसी अद्ययावतीकरणानुसार आत्तापर्यंत एक लाख 16 हजार 540 (88.61%) लोकांनी ई-केवायसी अपडेट केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड, ज्यामध्ये पीक लागवडीसाठी, पशुधन संगोपनासाठी, मच्छी पालनासाठी, बँकेकडून खेळते भांडवल मंजूर करण्यात येते, त्या शेतकऱ्यांनी आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत संबंधित कागदपत्रे जमा करून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली आहे. यासाठी संबंधित कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, बँका यांना आपापल्या क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या संहयोगाने मेळावा घेऊन किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी दिले आहेत. तरी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री...

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी दि.20 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
अलिबाग,दि.16 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने  “ नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ”  मंगळवार, दि.20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 467 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती  www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. तसेच या विनामूल्य रोजगार मेळाव्यास नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा,...

“स्वच्छ सागर सुरक्षित सागर” “स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र” मोहीमेसाठी शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे

    अलिबाग,दि.16(जिमाका):- केंद्र शासनाचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, इतर मंत्रालये तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने भारतीय किनारपट्टीवरील 75 समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची 75 दिवसांची “ स्वच्छ सागर सुरक्षित सागर ” “ स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र ” मोहीम सुरू केली आहे.        ही मोहीम दि.5 जुलै 2022 रोजी सुरू झालेली असून या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, किहिम, मांडवा, रेवदंडा, आक्षी, नागाव,   तर मुरुड तालुक्यातील मुरुड, काशीद, आणि श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ, वेळास, आरावी या समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.                   या मोहिमेंतर्गत निवड करण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांवर शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.   त्यानुसार समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेसाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचा...

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून रब्बी भाजीपाला व कडधान्य क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

    अलिबाग,दि.16(जिमाका):- या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ओढे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सध्या पावसाळा संपत आल्यामुळे ओढे नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे हाती घेण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.               जुलै ते सप्टेंबर पावसाळा हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू असतो हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागवण्यासाठी उपलब्ध साधनांचा जसे की सिमेंट किंवा खताची मोकळी पोती, वाळू, माती, इत्यादीचा वापर करून बांधलेला बंधारा म्हणजे वनराई बंधारा होय. दहा मीटर लांबीचा व 1.20 मीटर उंचीचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ३९ पोती आवश्यक असतात यातून 2 हेक्टर क्षेत्राकरिता संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामुळे रब्बी हंगामातील ...

तृतीयपंथियांनी नोंदणी करून ओळखपत्र मिळविण्याकरिता समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

    अलिबाग,दि.16 (जिमाका):-   जिल्ह्यातील तृतीयपंथियांच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार तृतीयपंथियांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी   www.transgender.dosje.gov.in   या पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. तसेच तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या काही तक्रारी असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील आर्थिक स्तर उंचाविलेल्या शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचे प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग, दि.16 (जिमाका):-   राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वेच्छेने सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा (GIVE IT UP) पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जे शिधापत्रिकाधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभ मिळण्यास पात्र होते, मात्र कालांतराने त्या शिधापत्रिकाधारकांचे व शिधापत्रिकेतील सदस्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले व त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असून आता त्यांचे उत्पन्न अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी त्यांची शिधापत्रिका अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून स्वखुशीने बाहेर पडून त्यांच्या उत्पन्नाच्या निकषानुसार त्यांनी केशरी किंवा शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालयात जावून तसा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या GIVE IT UP चा अर्ज भरुन देवून उत्पन्नानुसार केशरी व शुभ्र शिधापत्रिका घ्याव्यात. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्...