Posts

विशेष लेख: “चला जाणूया नदीला..!”

Image
  गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण, आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये / जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता / साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  “ चला जाणूया नदीला ”  या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरुवात दि.2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम वर्धा येथून झालेली आहे. काय आहे हे अभियान, या अभियानाची उद्दिष्टे काय आहेत, हे अभियान कशाप्रकारे राबविले जाणार आहे इत्यादी बाबी जाणून घेवू या लेखाद्वारे.. अभियानाचे उद्दिष्ट:- 1. नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. 2. जनसामा...

भूमी अभिलेख विभागाची सरळसेवा भरती परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात

Image
  अलिबाग, दि.21 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागातील  “ गट क ”  पदसमूह- 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दि.9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा नोव्हेंबर 2022 या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. उमेदवारांनी दि.9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर या अर्जदारांना भूमी अभिलेख विभागाकडून दि.28 फेब्रुवारी ते दि.13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून भूमी अभिलेख विभागातील  “ गट क ”  पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दि.4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि.28 नोव्हेंबर ते दि.30 नोव्हेंबर 2022 ...

खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा बैठक संपन्न

Image
लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दिल्या सूचना अलिबाग, दि.18 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयी संबंधित विभागांच्या विभाग स्तर / जिल्हास्तरावरील अधिकारी तर काही राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लोकाभिमुख, लोकोपयोगी विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, क...

मांडुळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्यांविरोधात वनविभागाची कारवाई

Image
अलिबाग, दि.18 (जिमाका):-  महाड तालुक्यातील मोहोत येथील सचिन सहदेव पवार यांच्याकडे सात महिन्यांपासून मांडुळ जातीचा साप ठेवला होता. त्या सापाची विक्री करणार असल्याची माहिती सिस्केप संस्था व आऊल्स संस्थेचे प्रतिनिधी यांनी महाड वनक्षेत्रपाल श्री.आर.बी.साहू यांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारे महाड वनक्षेत्रपाल श्री.साहू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भिवघर-निगडे रस्त्यालगत दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी सापळा लावून गस्त करीत असता सचिन सहदेव पवार (रा.मोहोत, ता.महाड, जि.रायगड) व महेश रमेश मालुसरे (रा.काळीज, ता.महाड, जि.रायगड) यांना मांडुळ जातीच्या सापाची विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्यांच्याकडील 2 मोबाईल, 1 मोटार सायकल व 1 जिवंत मांडुळ जातीचा साप ताब्यात घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर बिरवाडी वनपाल यांनी आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम चे कलम 9, 39, 44 (अ), (4), 48 (अ), 49, 51, 52 नुसार परिमंडळ बिरवाडी रौ.गु.नं, बन्यजीव 1/2022.23 दि.16.11.2022 अन्वये वनगुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी दिली आहे. ही कारवाई रोहा ...

विशेष लेख: सोशल मीडियावर मेसेजेस् फॉरवर्ड करताना राहा दक्ष..! आपल्यावर सायबर शाखेचे आहे बारीक लक्ष..!

Image
कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सारासार विचार न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेजेस् पोस्ट करणे, हा एक सामाजिक अपराध आहे. त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस्, फोटोज्, व्हीडिओज्, पोस्टस् सारासार विचार न करता फॉरवर्ड केले जातात. या चुकीच्या कृत्यांना आळा बसण्यासाठी महाराष्ट्र सायबर व्हॉट्सॲप या मेसेजिंग प्लॅटफॉर्म वरील सर्व ग्रुप सदस्य, ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप निर्माते (Creators/Owners) यांच्याकरिता महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या सायबर शाखेकडून मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली. या मार्गदर्शिकेतून काय मार्गदर्शन केले आहे, हे जाणून घेऊ या लेखातून… तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य असला तर हे करावे: ·           चुकीच्या/ खोट्या बातम्या द्वेष निर्माण करु शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करु नये. ·           आपल्या ग्रपुमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये. ·       ...

पनवेल तालुक्यात “सुवर्णा” भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका):-  महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी सन 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत असून, याबाबत महाराष्ट्र शासनाने पीक कापणी प्रयोग व्यवस्थित रितीने होण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करुन व समन्वय साधून पिक कापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी गेली अनेक वर्षे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील दि.13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबे तर्फे वाजे येथे शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राहूल सुर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सिताराम वारगडा हे उपस्थित होते. शासनाकडील निर्देशानुसार दि....