Posts

जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ.भरत बास्टेवाड यांचे आवाहन

    रायगड(जिमाका),दि.15:- गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. यासाठी  https://tinyurl.com/ ganeshraigad2023  या गुगल लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या गुगल लिंक वर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत. फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन पाणी व स्वच्छता विषयी जनजागृतीसाठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्स, बॅनर्स, पोष्टर द्वारे जनजागृती करणे श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन कृत...

दि.17 ऑक्टोबर ते दि.30 नोव्हेंबर 2023 या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत करता येणार आगाऊ मतदार नोंदणी

  रायगड(जिमाका),दि.15:-  आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र आता 1 जानेवारी , 1 एप्रिल,1 जुलै, आणि 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. 17 ऑक्टोबर 2023 ते दि.30 नोव्हेंबर 2023  या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.      निवडणूका न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे शुद्धीकरण व अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल.तसेच या कालावधीत दावे व हरकती देखील स्विकारण्यात येणार असून दि.26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत व. दि.5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.         मतदारांनी आपले नाव,...

भारतीय पोस्ट विभागाने ढाई आखर वार्षिक पत्र लेखन स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवल्या

    अलिबाग (जिमाका),दि.13:-   भारतीय पोस्ट  विभागाने    ढाई आखर वार्षिक पत्र लेखन प्रतियोगिता २०२३-२४ अंतर्गत - “ नये भारत केलीये डिजिटल इंडिया ” ( Digital India for New India)  या   विषयावर पत्र लेखन स्पर्धैची घोषणा केली असून    त्याची प्रवेशिकेची पत्रे चीफ पोस्टमास्टर जनरल ,   महाराष्ट्र सर्कल यांनी    31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मागवले आहेत. स्पर्धेसाठी देश   पातळी बक्षीस रक्कम पहिला क्रमांक 50 हजार दूसरा क्रमांक ,   25 हजार रुपये ,  तिसरा क्रमांक 10 हजार रुपये तसेच राज्य   पातळी पहिला क्रमांक बक्षीस रक्कम   25 हजार रुपये ,  दूसरा क्रमांक   10 हजार रुपये व तिसरा क्रमांक   5 हजार रुपये ,   स्पर्धेसाठी मराठी हिंदी/ इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषेमध्ये अ) आंतरदेशीय पत्र श्रेणी (500 शब्द) (ब) लिफाफा श्रेणी     ( 1000 शब्द) नुसार 18 वर्षापर्यंत    व    18वर्षापुढील सर्व नागरीक या दोन स्वतंत्र वयोगटात भाग घेता येईल.       ...

मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश सुरु

  रायगड(जिमाका) 13 :-   सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण यांच्या अंतर्गत मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे   शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हुशार ,होतकरु, मागासवर्गीय,अर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असून वसतीगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत 20सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात खालील पत्त्यावर विनामूल्य् उपलब्ध आहेत. 1.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अलिबाग, गणेशमंदिर शेजारी,विजय नगर,वरसोली-अलिबाग.2.मागासवर्गी य व अर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अलिबाग,दिव्या अपार्टमेंट,आर.सी.एफ.गेट समोर वेश्वी-अलिबाग,3. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह महाड तालुका पोलीस स्टेशनजवळ, नवेनगर, महाड जि.रायगड,4. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह तळा,तालुका क्रीडासंकुलाजवळ, बोरघर-हवेली,ता.तळा.5. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, चंद्रकांत कॉम्प्लेक्स, चांभारखिंड,रिलायन्स् पेट्रोल पंपाशेजारी, महाड,6. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसत...

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन

      रायगड(जिमाका) 13 :-   महिला बचत गटांना रोजगाराचे साधन खुले व्हावे, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेत अलिबाग शहरातील कुंठे बाग येथे गणेशोत्सव अनुषंगाने बचतगटांसाठी विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज महोत्सवाचे उद्घाटन केले. महोत्सवातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यात येतात. बचत गटातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी साह्य करण्यात येते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी विविध ठिकाणी महोत्सव भरविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणेशोत्सव निमित्त विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूह, यशदा महिला स्वयंसहायता समूह, नवोदय महिला स्वयंसहायता समूह, तेजोमय महिला स्वयंसहायता समूह, देविका महिला स्वयंसहायता समूहाने स्टॉल लावले आ...

जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते शुभारंभ

                  रायगड(जिमाका) 13 :-   रायगड जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले. जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विठ्ठल इनामदार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमती जोशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात नागरिक आणि संस्था सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात  क्षयरुग्णांना  औषधे व सीएसआर मधून प्रोटिन्स युक्त आहार देता येईल. या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग मुक्त कार्यक्रम राबविण्यासाठी 75 गावे निवडण्यात आले आहेत असे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले.      ...

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार-- डॉ.भरत बास्टेवाड

    रायगड(जिमाका) 13 :-  महात्मा गांधी  जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबविले जाणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कचरामुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून, यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेत ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले यासह इतर सार्वजनिक ठिकाणी मोहिम राबविली जाणार आहे. स्वच्छतेसाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करून त्यांच्याकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषतः टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात दि.17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शा...