Posts

राज्यात कुष्ठरोग आता "नोटिफायबल डिसीज" सर्व नव्या रुग्णांची नोंदणी शासनाला कळविणे बंधनकारक

  रायगड-अलिबाग (जिमाका) दि.17 :-  राज्य सरकारने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे परिणामी राज्यातील सर्व डॉक्टरांना कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची नोंद दोन आठवड्याच्या आत आरोग्य विभागाकडे करणे बंदरकारक असणार आहे. राज्यात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव रोखणे आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावे त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टरियम लेप्रे या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. त्वचा परिघीय नसा, डोळे आणि अन्य अवयवावर त्याचा परिणाम होतो या आजाराब‌द्दल अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव दिसून येतो. लवकर निधान न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख उपाय असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. राज्य शासनाने 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरोगाविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे. कुष्ठरोग नियंत्रणास...

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी अधिसूचना जारी

    रायगड-अलिबाग (जिमाका) दि.17 :-  मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावरील अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक,विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर दररोज सकाळी 08.00 वा. ते दु. 12.00 वा.पर्यंत तसेच सायं.16.00 ते रात्री 20.00 वा.पर्यंत या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत जड अवजड वाहनांकरिता (दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपआपली वाहने घेऊन येत असतात. पर्यटकांची वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा रस्ता अरुंद असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रक मातीची/खडीची वाहतूक करणारी वाहने व सिमेंट कॉन्क्रीटीकरणाकरीता सिमेंट मिक्सर, इतर सामन...

जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी; एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण

  रायगड-अलिबाग,दि.(जिमाका):-  रायगड जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते दि.02 डिसेंबर 2025 या कालावधीत "कुष्ठरोग शोध मोहीम अभियान" राबविण्यात येणार असून 2027 पर्यंत जिल्हयात कुष्ठरोग्याची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात "शून्य कुष्ठरुग्ण प्रसार" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे 100 टक्के व शहरी भागातील जोखीमग्रस्त 30 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना आशा सेविका व स्वयंसेवक भेटी देणार असून एकूण 23 लाख 30  हजार 871 लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.        मोहिमेचा उद्देश :-  समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारा‌द्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार ...

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ

  रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):- सै निक कल्याण विभागातील सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीबाबत सैनिक कल्याण विभागाच्या  www.mahasainik.maharashtra. gov.in ,  या संकेत स्थळावर उमेदवाराकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.05 नोव्हेबर 2025 पर्यंत देण्यात आली होती.  तथापि जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्याकरिता अर्ज भरण्याकरिता दि.26 नोहेबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे. ०००००००

जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांचेकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. दि.13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवा...

पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Image
    रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका):-  युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र रायगड, पनवेल महानगरपालिका, जिल्हा प्रशासन रायगड, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्थानिक सीकेटी महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने  “ सरदार@150 युनिटी मार्च ”  आणि  “ विकसित भारत पदयात्रा ”  याउपक्रमाचे आयोजन 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत पनवेल येथे करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा युवा अधिकारी  अमित पुंडे यांनी केले आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावनानिर्माण करणे असा आहे. या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य,अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंधभारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे. देशव्यापी मोहिमेची पार्श्वभूमी 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने माय भारत पोर्टलवरून ‘सरदार...

उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे---जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
      रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका):- उद्यम शिलतेतून सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अहमदाबाद उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई पुरस्कृत नावडे पनवेल को ऑफ इंडस्ट्रीज सभागृह पनवेल येथे (दि.11 नोव्हेंबर) रोजी आयोजित महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पनवेल तहसिलदार मिनल भांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, रायगड जिल्हा बँक तळोजाचे व्यवस्थापक नितेश तोंडसे, उद्योजक विजय लोखंडे, उद्योजक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका श्रीमती राजश्री पाटील उपस्थित होते. भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) व टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायीत्व विभागाकडून पुरस्कृत उदया प्रकल्पांतर्गत दोन आठवडे कालावधीचे महिला व दिव्यांगांकरीता उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमात सर्व प्रथम ईडीआयचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रशिक्षणामध्ये सहभागी प...