महाड दुर्घटना शोध मोहिमेसाठी सोनार यंत्रणेचा वापर

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 10 ऑगस्ट, 2016                                                                                          वृत्त क्र.509
महाड दुर्घटना
शोध मोहिमेसाठी
सोनार यंत्रणेचा वापर

            अलिबाग दि.10 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आता पर्यंत 26 मृतदेह हाती आले आहेत. विविध अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या माध्यमातून महाड व त्यापुढील नदी पात्र परिसरात ही शोध मोहिम सुरु आहे. यात आता नव्याने सोनार या यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.
          या सोनार यंत्रणेत ध्वनी लहरींच्या माध्यमातून प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा बोटीमध्ये बसविलेल्या संगणक पडदयावर दिसते व त्यायोगे पाण्याखाली असलेल्या वस्तूचे आकलन होऊ शकते. या यंत्रणेचा वापर एन.डी.आर.एफ. च्या मार्फत होत आहे.
शोध मोहिमेमध्ये एन.डी.आर.एफ. चे जवान, तसेच के.एम.बी. कम्युनिकेशन डिव्हाईस 8 डायव्हर्स सह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8 डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, स्थानिक मच्छिमार बांधव अशी सर्व मंडळी आपले शर्थीचे प्रयत्‍न करीत आहेत.
मदत व नियंत्रण केंद्र
शोध मोहिमेची माहिती देणे नियंत्रण ठेवणे तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना माहिती देऊन मदत करणे आदि कार्यासाठी महाड येथे  मदत व नियंत्रण केंद्र 24 तास कार्यरत आहे. या मदत केंद्रात स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले सातत्याने समन्वयाने साधून तसेच मार्गदर्शन करीत आहेत. तसेच आमदार नितेश राणे यांनीही भेट दिली. मदत केंद्रामध्ये उपस्थित असलेल्यांना काल सोनार मशिन बाबत तसेच तपास यंत्रणेबाबत माहिती देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर हे या मदत केंद्राचे नियंत्रण करीत आहेत. तर महाडचे तहसिलदार संदिप कदम, नायब तहसिलदार सचिन गोसावी, महेंद्र बेलदार व त्यांचे सर्व सहकारी   शोध व मदतसाठी  अहोरात्र कार्यरत  आहेत.
दुर्घटना स्थळ ते सावित्री नदी समुद्रास जेथे मिळते या परिसरातील नागरिकांनी त्यांना काही आढळून आल्यास प्रशासनास तात्काळ कळवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत. महाड दुर्घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व  दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक