जलयुक्त शिवार अभियान धोदानी परिसराला वरदान

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 29 जुलै 2016                                                                  लेख क्र- 18, भाग-1                                                                                                                                                                         
 जलयुक्त शिवार अभियान
धोदानी परिसराला वरदान

        महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविली आणि मोठी जलक्रांतीच घडून आली.  पाणी दुष्काळग्रस्त महाराष्ट्र 2019 पर्यंत जलसमृध्द महाराष्ट्र करण्याची ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.  26 जानेवारी 2015 रोजी याची सुरुवात झाली.  तर राज्यस्तरीय शुभारंभाचा सन्मान रायगड जिल्ह्याला मिळाला.  रायगडच्या पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या शुभहस्ते झाली.    एका महत्वाकांक्षी योजनेचा हा पाया अतिशय भक्कम ठरला आणि येथील बंधारा भरभरुन वाहू लागला.  ही कथा आहे या जलयुक्त शिवार अभियानाची-धोदानी परिसराच्या जलविकासाची...

प्रस्तावना-सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 च्या अंतर्गत राज्यातील टंचाई परिस्थितीवर कायम स्वरुपाची मात करण्यासाठी आपल्या शासनाने जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार हे अभियान राबविले.
            महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषिक्षेत्रावर  होत आहे.  या सर्व बाबींचा विचार करता जलयुक्त शिवाराची योजना राज्यात साकारली गेली.
पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे.  भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.  राज्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करणे-शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.  राज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची, शाश्वत-ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीविकरण करुन पाणीपुरवठयात वाढ करणे.  भूजल अधिनियम अंमलबजावणी.  विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे.  पाणीसाठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणेे.  अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे/वाढविणे.  अस्तित्वातील जलस्त्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोतांचा पाणीसाठी वाढविणे.  वृक्षलागवडीस प्रेात्साहन देऊन वृक्ष लागवड करणे.  पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव,जागृती निर्माण  करणे.  शेतीतील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन,जनजागृती करणे.  पाणी अडविणे,जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश ठेऊन हे अभियान राबविण्यात आले.


धोदाणी जलविकास
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिह्यात 45 बंधारे पहिल्या टप्यात मंजूर झाले.  त्यातील धोदाणी हा एक बंधारा.  पनवेल तालुक्यातील हा परिसर काहीसा आदिवासी लोकांची वस्ती असलेला.  जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यस्तरीय उद्घाटन झालेला बंधारा म्हणून धोदाणीचे नाव घेतले जाते.    या भागातील गट क्रमांक 3,4 व 5 मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्याची कामे करण्यात आली.  राज्यस्तरीय उद्घाटन झालेला हा बंधारा केवळ 9.98 लाख रुपये खर्चून फक्त 41 दिवसात पूर्ण करण्यात आला.  अगदी तारखेनिहाय विचार केला तरी असे लक्षात येते की, 26 जानेवारी 2015 रोजी भूमिपुजन, 20 फेबु्‌वारी 2015 रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात आणि 31 मार्च 2015 रोजी काम पूर्ण अशी महत्वपूर्ण प्रगती या बंधाऱ्याच्या बांधकामात झाली आहे.   बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी 20 मीटर, उंची 2.80 मीटर, पाणीसाठा उंची 1.5 मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रुंदी 0.60 मीटर असा आहे.  जवळपास 10.43 टीएमसी पाणीसाठा यात अपेक्षित आहे.  एकूणच या तीनही बंधाऱ्यातील पाण्याचा अपेक्षित साठा हा 31.21 टीएमसी असा आहे. 
बंधारा पूर्ण झाल्यानंतर प्रतिक्षा होती ती पावसाची.   पावसाने देखील आपली हजेरी लावली आणि बंधाऱ्यात पाणी साचले.  साचलेले पाणी पाहून एक काम यशस्वी झाल्याने समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागले.  तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2015 रोजी जलपुजनही करण्यात आले.  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुर्नभरण व पाणी आडविले गेले.  त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.  तसेच आसपासच्या साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळ जवळ 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच भाजीपाला, फळपिके व चारापिके यांची लागवडीच्या क्षेत्रात वाढ    झाली आहे. एकूणच या परिसराचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे. 
एक थेंब आहे लाख मोलाचा,
थेंब थेंब अडवून प्रश्न सुटेल पाण्याचा...
000000

डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड